Kidnapping : अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह नदीपात्रात सापडला | पुढारी

Kidnapping : अपहरण झालेल्या चिमुरडीचा मृतदेह नदीपात्रात सापडला

पुणे; पुढारी वृत्तसेवा:

येरवड्यातील महिलेच्या चिमुरडीचे अपहरण Kidnapping झाले हाेते. अपहृत चिमुरडीचा मृतदेह आज नदीपात्रात आढळला. या घटनेमुळे येरवडा परिसरात  खळबळ उडाली आहे.

(Kidnapping) दाेन दिवसांपूर्वी झाले हाेते अपहरण

पल्लवी बाळू भोंगे (वय. २८, रा. येरवडा) या १३ वर्षांच्या मोठ्या मुलगा आणि तीन महिन्‍यांच्‍या मुलीसह  येरवडा परिसरात राहतात. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी घरात झाेपलेल्‍या मुलीला कोणीतरी उचलून नेले होते. हे लक्षात येताच पल्लवी भोंगे यांनी आजूबाजूच्या परिसरात विचारपूस करून शोध घेतला.  बराचवेळ शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. त्‍यांनी आपल्‍या तीन महिन्‍याच्‍या मुलीचे अपहरण झाल्‍याची फिर्याद येरवडा पोलिस ठाण्यात दिली.  पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास सुरू केला.

घातपाताची शक्यता

पोलिसांना येरवड्यातील नदीपात्रात चिमुरडीचा मृतदेह सापडला. मुलीचा घातपात झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक आर. व्ही. वारंगुळे करीत आहेत.

हेही वाचलं का? 

पहा व्हिडिओ : पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची? पुरूष लावणी कलावंताची कहाणी

Back to top button