सहकार विभागातील गट 'क' संवर्गातील 303 पदांच्या भरतीसाठी आयुक्तालयाने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसबरोबर करार केला असून 15 ऑगस्टपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होईल. या पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहकार अधिकारी श्रेणी एक व सहकार अधिकारी श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक, सहायक सहकार अधिकारी, लघुटंकलेखक आणि लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांचा समावेश आहे. गट 'क' संवर्गातील पदांमध्ये सहकार आयुक्तालय मुख्यालयात 29, पुणे -23, कोल्हापूर -26, अमरावती -36, औरंगाबाद -24, नाशिक -40, कोकण -27, मुंबई- 23, लातूर -30, नागपूर- 38 आणि लेखापरीक्षकांची 7 पदे नाशिक जिल्ह्यासाठी भरण्यात येतील. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने परीक्षा होणार असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होताच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.