SSC Result Marks Verification Process : विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत करता येणार गुणांची पडताळणी, कसा करायचा अर्ज जाणून घ्या सविस्तर | पुढारी

SSC Result Marks Verification Process : विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत करता येणार गुणांची पडताळणी, कसा करायचा अर्ज जाणून घ्या सविस्तर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून शुक्रवारी (दि.2 जून) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. (SSC Result Marks Verification Process)

निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयांत विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल. (SSC Result Marks Verification Process)

हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http://verification.mh-ssc.ac.in यावर करता येईल. गुणपडताळणीसाठी 3 जून ते 12 जूनपर्यंत अर्ज करता येईल. तर छायाप्रतीसाठी 3 जून ते 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button