जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले सौभाग्यवतीचे औक्षण | पुढारी

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले सौभाग्यवतीचे औक्षण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी त्यांच्या सौभाग्यवती विजया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण केले. डॉक्टर देशमुख यांनी केलेल्या औक्षणचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विजयादशमीच्या दिवशी विजया देशमुख यांचा वाढदिवस असतो. या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी त्यांना स्वतः ओवळले. नवरात्रामध्ये आपल्याकडे नवदुर्गांचा सन्मान करण्यात येतो. आपल्या घरातील महिलेचा सन्मान प्रशासकीय अधिकारी यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने केल्याने एकच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : शरद पवारांचा हल्लाबोल : तपास यंत्रणा छापे टाकतात, खुलासा भाजप नेते करतात!

प्रशासनातील मोठे अधिकारी साध्या पद्धतीने वागतात तेव्हा त्यांची जोरदार चर्चा तर होतेच. आजही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीचा वारसा मोठा आहे. यामध्ये महिलांना सन्मान मिळताना अडचणींचा सामना करावा लागतो. आजही ग्रामीण भागामध्ये महिलेला चूल आणि मूल अशीच वागणूक दिली जाते. ग्रामीण भागातून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेला महिलेचा सन्मान एक आदर्श वाटतो.

Back to top button