पुणे : देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी बनली मिनीएशन्स इंडिया लिमिटेड | पुढारी

पुणे : देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी बनली मिनीएशन्स इंडिया लिमिटेड

देहूरोड; पुढारी वृत्तसेवा

ऑल इंडिया ऑर्दनन्स फॅक्टरी बोर्ड बरखास्त करून त्याजागी सात नव्या कंपन्यांना ऑर्डनन्स फॅक्टरीचा ताबा देण्यात आला आहे. देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीला मिनीएशन्स इंडिया लिमिटेड या नावाने येथून पुढे ओळखले जाणार आहे. यावेळी प्रथमच दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन करण्यात आले.

देशाच्या ४१ ऑर्डनन्स फॅक्टरीचे बोर्ड बरखास्त करण्यात आले. आर. सी. एल, ग्लायडर्स, ॲडव्हान्स वेपन्स ॲन्ड इक्विपमेंट्स इंडिया लिमिटेड, इंडिया ऑप्टिकल लिमिटेड, यंग इंडिया, मिनीएशन्स इंडिया लिमिटेड, अवनी अशा सात कंपन्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी देण्यात आल्या. देहूरोड फॅक्टरीला मिनीएशन इंडिया लिमिटेड या कंपनीकडे देण्यात आहे.

या कार्यक्रमात   कार्यक्रमाला ते ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाला ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक संजीव गुप्ता, सिक्युयूएसव्हीचे ब्रिगेडियर भारत भूषण, सेंट्रल ऑर्डनन्स डेपोचे कमांडंट बिपिन रावत, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरित्वल, लेफ्टनंट कमांडर गौरव शर्मा आदी उपस्थित होते.

यावेळी डेपोमध्ये प्रथमच शस्त्रपूजन करण्यात आले. शस्त्र पूजनानंतर सन्मान चिन्ह वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ब्रिगेडियर धनकर यांनी आता आपण परदेशातही निर्यात करू शकतो असे उद्गार काढले.

तसेच ऑर्डनन्स फॅक्टरीमधील उत्पादन अधिक क्षमतेने आणि अधिक प्रभावीपणे तयार करताना आनंद होईल असे संजीव गुप्ता यांनी यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : कोरोनाच्या काळात अनेकांचे जीव वाचवणाऱ्या डॉ. अनिता सैबन्नावर | महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत

Back to top button