पाणी पुरी खाण्याची अनोखी स्पर्धा : पुणेकर महिलांनी 5 हजार प्लेट पाणीपुरी केली फस्त | पुढारी

पाणी पुरी खाण्याची अनोखी स्पर्धा : पुणेकर महिलांनी 5 हजार प्लेट पाणीपुरी केली फस्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महिलांसाठी म्हणजेच अगदी नातीपासून ते आजीपर्यंत सर्वांसाठी पाणीपुरी खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कसबा पेठेत झालेल्या या स्पर्धेत 3 हजार 500 महिलांनी सहभाग घेत चक्क 5 हजार प्लेट पाणीपुरी फस्त केली. प्रल्हाद गवळी मित्र परिवारतर्फे महिलांसाठी पाणीपुरी खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, रमेश कोंढरे, माजी आमदार दीपक पायगुडे, अजय सरपोतदार, आयोजक प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते. गवळी म्हणाले, सर्वसामान्य महिला चूल आणि मुल यासोबतच आपले कुटुंब याभोवती बहुतांश वेळ असतात. त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद देता यावा आणि सर्व वयोगटांतील, क्षेत्रांतील महिलांनी एकत्र यावे, यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला.

Back to top button