पुण्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून; जनता वसाहत परिसरातील घटना - पुढारी

पुण्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून; जनता वसाहत परिसरातील घटना

पुणे, पुढारी वृत्तसेवा

जनता वसाहत येथील रामकृष्ण मठाच्या मागे कॅनॉल रोडजवळ एका तरुणाच्या दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

योगेश अंकुश भोकरे (वय ३८, रा. गल्ली नं. २३, जनता वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. औषधं याच्या बहाण्याने भोकरे घराबाहेर पडले होते.

याप्रकरणी पत्नी आदिती योगेश भोकरे ( वय. ३१, रा. जनता वसाहत ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोकरे हे मंगळवारी सायंकाळी औषध घेऊन येण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह कॅनॉल रोडला पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता भोकरे यांच्या डोक्यात, चेहर्‍यावर दगड घालून त्यांचा खून केल्याचे आढळून आले. भोकरे यांची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्यांच्या अंगावरील पॅन्ट देखील काढून फेकून दिली. पुढील तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button