समान नागरी कायदा हा केंद्राचा विषय, शरद पवार यांचे भाष्य - पुढारी

समान नागरी कायदा हा केंद्राचा विषय, शरद पवार यांचे भाष्य

बारामती; पुढारी वृत्तसेवा : समान नागरी कायदा या विषयावर न्यायालयाने केंद्राला सुचविले आहे. समान नागरी कायदा करण्यासाठी केंद्र सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत भाष्य करता येणार नाही. परंतु न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र आता काय करतेय हे पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

अधिक वाचा : पंकजा मुंडे दिल्लीत, नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

अधिक वाचा : आसाम : “हिंदू मुलाने हिंदू मुलीला खोटं बोलला, तर तोही जिहाद आहे”

आमचे त्याकडे लक्ष असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्राने सहकार विभाग स्थापनेवर शरद पवार काय म्हणाले?

पवार म्हणाले, केंद्राने सहकार विभाग स्थापन केला. परंतु त्याने फारसा फरक पडणार नाही. सहकाराचे कायदे महाराष्ट्राच्या विधानसभेने केले आहेत. त्या कायद्यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. राज्यातील सहकारावर केंद्राचे नियंत्रण राहणार या ज्या बातम्या येताहेत त्याला फारसा काही अर्थ नाही. कारण हा विषय घटनेने राज्य सरकारचा आहे.

अधिक वाचा : सिंघु बॉर्डर : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लंगरला आग

अधिक वाचा : पुणे जिल्ह्यात दिवसभरात १११४ कोरोना रुग्ण, १४ जणांचा मृत्यू

मल्टिस्टेट याचा अर्थ दोन राज्यात रजिस्टर झालेली संस्था असा असतो. दोन राज्यात काम करणारी संस्था एका राज्याला बघता येत नाही. तो विषय केंद्र सरकारच्या सहकार खात्याकडे जातो. म्हणून आत्ता जो सहकाराचा निर्णय झाला आहे, तसा तो नवीन नाही.

दोन राज्यांच्या संबंध असलेल्या सहकारी संस्थांबाबत निर्णय केंद्राच्या सहकार खात्याचा भाग राहिल. मी केंद्रात असतानाही हे केले होते. आत्ताच्या सरकारनेही ते केले आहे. त्यात काही वेगळे नाही. दुदैवाने महाराष्ट्राच्या सहकारावर गंडांतर आहे, बंधने आणली अशी चर्चा केली जाते. केंद्राने बाजार समित्यांसाठी एक लाख कोटींची तरतूद केली असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले,

अधिक वाचा : अभिनेता आमीर खान आणि किरण राव : चर्चा तर होणारच!

अधिक वाचा : सिंहायन आत्मचरित्र : डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव

हा निर्णय चांगला आहे. मार्केट कमिट्यांच्या सुधारणांसाठी, भांडवली गुंतवणूकीसाठी ही चांगली गोष्ट आहे.

नाना पटोलेंनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देण्यास पवार यांनी नकार दिला. ते महान माणसं आहेत.

त्याच्यावर मी कशाला बोलू. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी प्रतिक्रिया दिली असती.

विधानभवनातील राड्याच्या विषयावर पवार म्हणाले, गोंधळ झाला. त्यावर विधानसभेने निर्णय घेत शिक्षा केली.

आता ते कशाला जुने उकरून काढायचे. ज्यांनी चुकीचे काम केले असे विधानसभेला वाटले त्यावर त्यांनी एक वर्षाच्या शिक्षेचा निर्णय घेतला.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार

विधानसभेचे अध्यक्षपद कांग्रेसकडेच राहिल, हे तीन पक्षांचे ठरले आहे. त्यामुळे बाकी कोणी काही म्हटले तरी त्याला अर्थ नाही. काँग्रेसकडेच अध्यक्षपद राहिल, यात शंका नाही. काँग्रेसकडून दिल्या जात असलेल्या स्वबळाच्या नार्यावर पवार म्हणाले, स्वतःचा पक्ष प्रत्येकजण वाढवत असतो.

अधिक वाचा : पावनखिंड रणसंग्रामातील वीरांचे बलिदान इतिहासकारांना खुणावतेय !

अधिक वाचा : सिंघु बॉर्डर : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लंगरला आग

आम्ही ही ते करत असतो. ते चुकीचे नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो. पक्ष एकत्र चालवत नाही. त्यामुळे त्यातून कोणताही गैरसमज आमच्यात नाही. एकसंघपणे आम्ही सरकार चालवत आहोत.

हे ही वाचा : 

कृषी कायदे राज्यात जसेच्या तसे लागू करा, भाजप नेते अनिल बोंडे यांची मागणी

हिंगोली : वीज पुरवठा विस्कळीत; अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना चार तास कोंडले

कास पठार : ३०० फूट दरीत युवक कोसळला, रेस्क्यू फोर्सने वाचवले

Back to top button