…अन्यथा मुख्यमंत्री शिंदे यांचा अडविणार ताफा

…अन्यथा मुख्यमंत्री शिंदे यांचा अडविणार ताफा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समितीच्या वतीने स्वाधार योजनेतील थकीत रक्कम न दिल्यास विद्यार्थ्यांनी राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे पदाधिकारी सुमित थोरात, राजरतन बलखंडे, अनिकेत बनसोडे, महेश बळवंत, स्नेहल गिरमकर, अस्मिता बेडलवार आदी उपस्थित होते.

बलखंडे म्हणाले, योजनेची थकीत रक्कम केव्हा मिळेल, याची दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. तसेच स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा नसल्याने समाजकल्याण कार्यालयात वारंवार जावे लागते. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे स्वाधारसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणाचा, राहण्याचा, जेवणाचा खर्च भागवता यावा या उद्देशाने 2016 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समाजकल्याण विभागाकडून आवश्यक कार्यवाही केली जात नाही. राज्य शासनाने आतापर्यंत केवळ खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे यापुढील काळात मागण्या मान्य झाल्या नाही, तर राज्यातील सर्व जिल्ह्यांत बेमुदत उपोषण करण्याचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा निर्णय समितीतर्फे घेण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news