वडगाव मावळ : नागरिकांना गॅस सिलिंडर घरपोच द्यावा | पुढारी

वडगाव मावळ : नागरिकांना गॅस सिलिंडर घरपोच द्यावा

वडगाव मावळ : वडगाव शहर व परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर घरपोच द्यावा, अशी मागणी वडगाव शहर राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष तुषार वहिले यांनी केली आहे. वडगाव येथील नागरिकांना एका एजेंसीकडून गॅस सिलिंडरचे वाटप केले जाते. परंतु, गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून गॅस सिलिंडर घरपोच येत नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या दहावीच्या व शालेय परीक्षा सुरू आहेत. त्यातच सिलिंडर घरपोच मिळत नसल्यामुळे विशेषतः महिलांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.

गॅस एजन्सीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, काही ज्येष्ठ नागरिक घरी असतात त्यांना जाणे येणे शक्य होत नाही. काही लोकांकडे वाहन नसल्यामुळे त्यांना गॅस एजन्सीकडे जाऊन सिलिंडर आणता येत नाही. अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एजन्सीने ग्राहकांना घरपोच सिलिंडर द्यावा. त्यासाठी कामगारांची संख्या वाढवावी. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कामगारांना गॅस एजन्सीचे ओळखपत्र द्यावे. गॅस एजन्सीचा संपर्क भ्रमणध्वनी जाहीर करावा, अशी मागणी वहिले यांनी केली आहे.

Back to top button