केज तालुक्यात शालेय गॅद्ररिंगनंतर दोन गटात मारहाण | पुढारी

केज तालुक्यात शालेय गॅद्ररिंगनंतर दोन गटात मारहाण

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमात दोन मुलांचे आपसात भांडण झाले. त्या गावात दोन व्यक्तींची नावे एकसारखीच असल्याने भांडण झाले. एकाचे पण नंतर त्याच नावाच्या दुसऱ्या मुलाला आणि त्याच्या आईला पाच जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण झाली. या प्रकरणी विरुद्धॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वा. पिसेगाव ता. केज येथील ताई नवनाथ लांडगे या त्यांच्या मुलगा व मुली सोबत शाळेतील मुलांच्या गॅदरिंगचा कार्यक्रम पहात असताना सचिन रामहरी नेहरकर हा त्यांच्या जवळ आला आणि त्यांचा मुलगा महेश नवनाथ लांडगे याला त्याने लाथाबुक्याने मारहाण केली. त्याच वेळी नितीन माऊली नेहरकर, दत्ता रामहरी नेहरकर, व्यंकटेश दिनकर नेहरकर, इंद्रजीत हानुमंत नेहरकर हे संगनमत करून तिथे आले. त्यांनी चिथावणी देऊन महेश व त्याची आई यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. या वेळी ताई ही तिचा मुलगा महेश यास मारहाण करणाऱ्या पासून वाचवण्यासाठी महेशच्या अंगावर पडली. त्यावेळी जमावाने त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आणि जमावातील एकाने बेल्टने मारून ताई व महेश या दोघांना दुखापत केली.

या प्रकरणी ताई नवनाथ लांडगे हिच्या तक्रारीवरून दि. ७ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात सचिन रामहरी नेहरकर, नितीन माऊली नेहरकर, दत्ता रामहरी नेहरकर, व्यंकटेश दिनकर नेहरकर आणि इंद्रजीत हानुमंत नेहरकर सर्व रा. पिसेगाव ता. केज या पाच जणांच्या विरुद्ध गु. र. नं. ७१/२०२३ भा. दं. वि. ३२३, ५०४ ५०६, १४३, १४७, १४९ यासह अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (ॲट्रॉसिटी) १९८९ चे कलम ३(२) (व्ही ए) ३ (१) (आर) 3 (१) (एस) नुसार गुन्हा दाखल झाला आहे त्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

एक सारख्या नावाने घोटाळा झाला

गॅदरिंगच्या कार्यक्रमात महेश चंद्रकांत लांडगे व नितीन माऊली नेहरकर या दोघात भांडण झाले होते. परंतु सचिन नेहरकर याने दुसऱ्याच म्हणजे महेश नवनाथ लांडगे यालाच मारहाण केली. एकाच नावाच्या दोन महेश नावामुळे भांडणं वाढले आणि त्याचे पर्यावसन मारामारीत झाले.

Back to top button