वडगाव मावळ : आढे येथे राज्यातील पहिला गोदाम प्रकल्प पूर्ण | पुढारी

वडगाव मावळ : आढे येथे राज्यातील पहिला गोदाम प्रकल्प पूर्ण

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सुमारे 22 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या गोदामचे काम पूर्ण झाले आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत गोदाम उभारणीचा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरला आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सुनीता ज्ञानेश्वर सुतार यांच्या पुढाकाराने आढे येथे हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोदाम उभारणीचा हा नावीन्यपूर्ण प्रकल्प रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे 14 लाख 47 हजार रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 22 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोदाम उभारणीचा हा नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात आला आहे. हा प्रकल्प भविष्यात ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा प्रकल्प ठरू शकेल.
                                                   – सुनीता सुतार, सरपंच, आढे

Back to top button