पिंपरी : आंबट-गोड द्राक्षे बाजारात दाखल | पुढारी

पिंपरी : आंबट-गोड द्राक्षे बाजारात दाखल

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी फळबाजारात सध्या 150 ते 300 रुपये किलो इतक्या दराने डाळिंबाची विक्री होत आहे. द्राक्षांचा हंगाम सुरु झाला असल्याने आंबट-गोड द्राक्षे 60 ते 70 रुपये किलो या दरात उपलब्ध आहेत. तर, लांबसडक पिवळसर हिरवा रंग असलेली सोनाका द्राक्षे 100 ते 140 रुपये किलोने विकली जात आहेत.

द्राक्षांचा हंगाम सुरु झाल्याने पिंपरीतील फळबाजारात विविध जातींची द्राक्षे विक्रीसाठी आली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आंबटगोड द्राक्षे, सोनाका द्राक्षे आणि शरद कॅप्सुल द्राक्षे, काळ्या रंगाची जंबो द्राक्षे यांचा समावेश आहे. शरद कॅप्सुल द्राक्षांचा सर्वाधिक दर असून ती 150 रुपये किलो या दराने विकली जात आहेत. काळ्या जंबो द्राक्षांचा दर 100 रुपये किलो इतका आहे. सर्वात कमी दर आंबटगोड द्राक्षांचा आहे. ती 60 ते 70 रुपये किलोने मिळत आहे.

लालबाग, बदाम खातोय भाव
फळबाजारामध्ये सध्या लालबाग आणि बदाम आंबा विक्रीसाठी आला आहे. लालबाग सध्या 200 ते 300 रुपये किलो या दराने विकला जात आहे. तर, बदाम आंबा 160 ते 250 रुपये किलो या दरात उपलब्ध आहे.

पिंपरी फळबाजारातील फळांचे दर (प्रति किलो)
सफरचंद 100 ते 200
गावरान चिकू 70 ते 100
गुजरात चिकू 50
खोबरा पेरु 50 ते 80
गावरान पेरु 60 ते 80
मोसंबी 80 ते 200
आंबटगोड द्राक्षे 60 ते 70
सोनाका द्राक्षे 100 ते 140
काळी द्राक्षे 100
शरद कॅप्सुल द्राक्षे 150
डाळिंब 150 ते 300
कलिंगड 10 ते 20
स्ट्रॉबेरी 25 ते 40
(200 ग्रॅम)

Back to top button