कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या; नाना पटोलेंनी उमेदवारीबाबत दिली माहिती | पुढारी

कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या हालचाली वाढल्या; नाना पटोलेंनी उमेदवारीबाबत दिली माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. आपण एकत्रित बसून यावर सविस्तर चर्चा करूया, मात्र माझा फोन होताच पुढील अर्ध्या तासात टिळक कुटुंबीयांऐवजी दुसर्‍या उमेदवाराला भाजपकडून संधी देण्यात आली. त्यातून भाजपाची नीती दिसून येते असे मत व्यक्त करत कसबा पेठ विधानसभेचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आज रात्री जाहीर होईल असे असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात जाहीर केले.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेण्यात आली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली आहे. त्यानुसार कसबा पेठ विधानसभेचा आज रात्री काँग्रेस पक्षाचा उमेदवार जाहीर होईल. तर, चिंचवडच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते भूमिका मांडतील”,  तसेच, आम्ही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोट निवडणूक बिनविरोध करण्याबाबत पटोले म्हणाले, की, आजपर्यंत एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यावर ती निवडणूक बिनविरोध होण्याची प्रथा होती. मात्र, मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील विधिमंडळात येऊन मतदानाचा हक्क बजावला होता. यातून भाजपने कशा प्रकारे टिळक कुटुंबाला न्याय दिला असे सांगत त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले.

Back to top button