पुणे: तरूणीचा पाठलाग करून विनयभंग | पुढारी

पुणे: तरूणीचा पाठलाग करून विनयभंग

पुणे, पुढारी वृत्तसेवा: घरापासून कामावर जात असताना तरूणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन राजशेखर गायकवाड (23, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज) याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 1 फेब्रुवारीला बिबवेवाडी येथील साईनाथ नर्सींग होमजवळ घडला. याबाबत एका 23 वर्षीय तरूणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Back to top button