पुणे शहरात चार घरफोडीच्या घटना | पुढारी

पुणे शहरात चार घरफोडीच्या घटना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात नवी पेठ, लोणीकंद, थेउर फाटा, वानवडी येथे झालेल्या चार घरफोड्यांच्या घटनांमध्ये चोरट्यांनी 5 लाख 37 हजारांचा ऐजव चोरून नेल्याचे प्रकार समोर आले आहे.

पहिल्या घटनेत नवी पेठेतील पार्वती किरण अपार्टमधील सदनिका फोडून चोरट्यांनी दोन लाखांचा सोन्याचा गंठण चोरून नेला. हा प्रकार 31 जानेवारी रोजी रात्री घडला. या प्रकरणी आशिष अरविंद शेटे (25, रा. पार्वती किरण, नवी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. दुसर्‍या घटनेत लोणीकंद येथील सुमीतकुमार संजय पाटील (30, रा. लोणीकंद) यांच्या राहत्या फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 1 लाख 20 हजारांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेऊर येथील पत्रावस्ती व गाढवे मळा येथे चोरट्यांनी घराचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी 2 लाख 2 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत किशोर वैजीनाथ शिंदे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौथ्या घटनेत वानवडी येथील जुन्या कार विक्री बाजाराच्या कार्यालयातून चोरट्यांनी लॅपटॉप, बॅटर्‍या, टेपरेकॉर्डर असा 15 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मोहम्मद अथर चौधरी (45, रा. सेंट्रल स्ट्रीट, कॅम्प) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 19 जानेवारी सकाळी उघडकीस आला.

Back to top button