पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचा स्वतंत्र कारभार सुरू | पुढारी

पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचा स्वतंत्र कारभार सुरू

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  महाळुंगे पोलिस चौकीला स्वतंत्र महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचा दर्जा मिळाला असून, बुधवार (दि. 1)पासून या चौकीचा संपूर्णपणे स्वतंत्र तांत्रिक कारभार सुरू झाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि नवनिर्मति महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

चाकण पोलिस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे पोलिस चौकीची निर्मतिी चार वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, महाळुंगे चौकीचे सर्व गुन्हे चाकण पोलिस ठाण्यात दाखल होण्यासाठी येत होते. नुकतीच महाळुंगे चौकीला पोलिस ठाण्याची मान्यता मिळाली होती. बुधवारपासून या नव्या पोलिस ठाण्याचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाईट चौकीच्या अंतर्गत असलेली सर्व गावे नवीन महाळुंगे एमआयडीसी पोलिस चौकीत समाविष्ट करण्यात आली आहे.

Back to top button