चाकण : कांदा, मिरची व फ्लॉवरची विक्रमी आवक | पुढारी

चाकण : कांदा, मिरची व फ्लॉवरची विक्रमी आवक

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, मिरची व फ्लॉवरची विक्रमी आवक झाली. लसणाचे भाव स्थिर राहिले आहेत. मेथीच्या भावात घट झाली. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय व बैलांच्या संख्येत घट झाली. म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 5 कोटी 20 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 10,750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 750 क्विंटलने वाढल्याने भावात 100 रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव 1 हजार 700 रुपयांवरून 1,600 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1 हजार 750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने घटून भावात 100 रुपयांची घट झाली.

बटाट्याचा कमाल भाव 1,500 रुपयांवरून 1,400 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 5 क्विंलने घटून कमाल भाव 5 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 375 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 50 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 4 ते 5 हजार रुपये असा भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कांदा – एकूण आवक – 10,750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,600 रुपये, भाव क्रमांक 2. 1,300 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1,750 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,400 रुपये, भाव क्रमांक 2. 1,200 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे :
टोमॅटो – 330 क्विंटल (600 ते 1,000 रु.), कोबी – 230 क्विंटल (300 ते 500 रु.), फ्लॉवर – 210 क्विंटल (800 ते 1,200 रु.), वांगी – 83 क्विंटल (1,000 ते 2,000 रु.), भेंडी – 82 क्विंटल (3,000 ते 4,000 रु.), दोडका – 54 क्विंटल (3,000 ते 4,000 रु.), कारली – 78 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), दुधीभोपळा – 63 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), काकडी – 72 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), फरशी – 46 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), वालवड – 74 क्विंटल (2,000 ते 4,000 रुपये), गवार – 52 क्विंटल (4,000 ते 7,000 रु.), ढोबळी मिरची – 112 क्विंटल (2,000 ते 4,000 रु.), चवळी – 42 क्विंटल (1,500 ते 2,500 रुपये.), वाटाणा – 525 क्विंटल (2,000 ते 2,400 रु.), शेवगा – 10 क्विंटल (7,000 ते 9,000 रु.), गाजर – 225 क्विंटल (1,200 ते 1,800 रु.).

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी – एकूण 21 हजार 650 जुड्या (800 ते 1,000 रुपये), कोथिंबीर – एकूण 30 हजार 500 जुड्या (900 ते 1,200 रुपये), शेपू – एकूण 8 हजार 950 जुड्या (500 ते 700 रुपये), पालक – एकूण 4 हजार 200 जुड्या (400 ते 500 रुपये).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 65 जर्शी गायींपैकी 53 गायींची विक्री झाली (15,000 ते 60,000 रुपये), 205 बैलांपैकी 165 बैलांची विक्री झाली (10,000 ते 40,000 रुपये), चाकणला विकीसाठी आलेल्या 255 म्हशींपैकी 210 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 25 हजार ते 70 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या-मेंढ्यांची संख्या वाढली असून, विक्रीसाठी आलेल्या 10,130 शेळ्यांपैकी 9,550 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Back to top button