ओशो आश्रमातील दोन चंदनाची झाडे चोरीला | पुढारी

ओशो आश्रमातील दोन चंदनाची झाडे चोरीला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रममधील तीर्थ पार्क येथून चोरट्यांनी दोन चंदनाची झाडे कापून चोरी करून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संतोष नामदास (42, रा. कोरेगाव पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धिरज कांबळे करत आहेत.

Back to top button