पुणे: धक्काबुक्की केल्याची विचारणा केल्याने खुनी हल्ला | पुढारी

पुणे: धक्काबुक्की केल्याची विचारणा केल्याने खुनी हल्ला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भावाला धक्का बुक्की केल्याची विचारणा केल्यानंतर शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आणि कोयत्याने डोक्यात वार करत खुनाचा प्रयत्न करणार्‍या तसेच दहशत पसरविणार्‍या चौघांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश गायकवाड (22, रा. जनता वसाहत, पुणे) यांनी चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 26 जानेवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दांडकर पुल येथील रामकृष्ण मठासमोर घडला.

Back to top button