kasba peth-chinchwad Bypoll : कसबा पेठ, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदानाच्या तारखेत बदल, ‘या’ तारखेला मतदान | पुढारी

kasba peth-chinchwad Bypoll : कसबा पेठ, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदानाच्या तारखेत बदल, 'या' तारखेला मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या (kasba peth-chinchwad Bypoll) तारखेत केंद्रीय निवडणूक आयागाने बदल केला आहे. या दोन्ही ठिकाणी आता २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. १२ वी आणि पदवी परिक्षांच्या तारखा ह्या पोटनिवडणूक मतदानाच्या दरम्यान आल्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते. याचा दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक मतदानाच्या तारखेत बदल केला आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी आहे. अर्जाची छाननी ८ फेब्रुवारी रोजी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी आहे. तर २६ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन २ मार्चला निकाल जाहीर होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील १ (एक) लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, झारखंड, तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथील विधानसभा मतदारसंघातील एकूण ६ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. यातील महाराष्ट्रातील दोन मतदारसंघातील मतदार तारखेत बदल करण्यात आला आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी आता पोटनिवडणूक होत आहे. (kasba peth-chinchwad Bypoll)

हे ही वाचा :

Back to top button