पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याचा फोन आला…पण समोर आलं हे सत्य | पुढारी

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याचा फोन आला...पण समोर आलं हे सत्य

पुणे पुढारी ऑनलाईन डेस्क : काही तासापूर्वी पुण्याचे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा फोन आला होता, मात्र हा फोन अफवा असल्याची माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. या घटनेने पुणे शहरात आणि रेल्वे स्टेशन परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तातडीने तपास सुरु केला असता कोणतीही संशयित वस्तू आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र हा फोन मनमाडमधून आला असल्याची माहिती मिळाली. फोन करून पुणे स्थानक या ठिकाणी दहशतवादी हल्ला होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्यास ३२ वर्षीय गोविंद भगवान मांडे याला पोलिसांनी कात्रज परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार, गोविंद भगवान मांडे हा काल रात्री मनमाड ते पुणे असा प्रवास करत असताना त्याच्या बोगीमध्ये पोलिसांसारखे दिसणाऱ्या दोघांनी त्याच्यासोबत विविध कारणांवरुन भांडण करत होते. या भांडणातून वाचण्यासाठी ११२ या क्रमांकावर त्याने फोन केला होता, परंतु हा फोन चालू असताना त्यांनी तो फोन काढून घेतला.

आम्हाला दहशतवादी हल्ल्यांचे काम करायचे असते, असे दोन व्यक्तींनी भांडणात सांगितले. मात्र हा फोन सुरु असल्याने सर्व माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार संपूर्ण चौकशी केली असता, हा फोन गैरसमजातून आला असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Back to top button