पुणे विमानतळावरील कार्गो सेवा पुन्हा सुरू | पुढारी

पुणे विमानतळावरील कार्गो सेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे विमानतळावरून विमानाच्या माध्यमातून होणारी मालवाहतूक गेली 10 ते पंधरा दिवस बंद होती, ती आता पुन्हा सुरू झाली आहे. पुणे विमानतळावरून विमानाच्या माध्यमातून मालवाहतूक करायची असेल, तर विमान कंपन्यांना परवान्याची आवश्यकता असते.
त्याशिवाय कंपन्यांना मालवाहतूक करता येत नाही. पुण्यातून मालवाहतूक करण्याचा परवाना फक्त एक ते दोन कंपन्यांकडेच आहे.

त्यांचा परवाना पंधरा दिवसांपूर्वी संपला होता. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने कार्गो सेवा बंद केली होती. आता संबंधित कंपन्यांनी आपल्या परवान्याचे नूतनीकरण केले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने येथून मालवाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात पुणे विमानतळावरून होणारी कार्गो सेवा बंद असल्यामुळे पुणेकर उद्योजकांचे मोठे हाल झाले. त्यांना आपले साहित्य ’बाय रोड’च विविध ठिकाणी पाठवावे लागले. आता कार्गो सेवा सुरू झाल्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button