मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील 12 गावे, वाड्यांवर नवीन नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत 46 कोटी 59 लाख 90 हजार रुपयांच्या निधीला माजी गृहमंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील धामणी 4 कोटी 99 लाख 57 हजार रुपये, तेरुंगण- निगडाळे 4 कोटी 64 लाख 27 हजार रुपये, चिंचोडी 4 कोटी 99 लाख 62 हजार रुपये, चांडोली बुद्रुक 4 कोटी 23 लाख 72 हजार रुपये, चास 4 कोटी 23 लाख 72 हजार रुपये, तळेकर वाडी 4 कोटी 69 हजार 9 हजार रुपये, साल 3 कोटी 9 लाख 42 हजार रुपये, घोडेगाव 4 कोटी 99 लाख 76 हजार रुपये, तर शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा 4 कोटी 33 हजार रुपये, फाकटे 4 कोटी 81 हजार 65 हजार रुपये, रावडेवाडी 3 कोटी 29 लाख 8 हजार रुपये, बुरुंजवाडी 2 कोटी 81 लाख 77 हजार रुपये असा एकूण 12 गावांसाठी 46 कोटी 59 लाख 90 हजार रुपयांचा निधी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मिळाला आहे, अशी माहिती विवेक वळसे पाटील यांनी दिली.