लोणी काळभोर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर महामार्गावर पुणे शहरा नजीकच्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे चित्तरंजन गायकवाड विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी कल्पना काळभोर यांचा २८०० मतांनी पराभव केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या १७ पैकी १६ जागांवर ही त्यांच्या नवपरिवर्त पँनलने दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी जनसेवा पँनलचे प्रमुख नंदू काळभोर एकमेव विजयी झाले आहेत. चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी विद्यमान सरपंच आहेत, या विजयाने गायकवाड दांपत्याने पुन्हा सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे.