ओतूर : सात वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

file photo
file photo
Published on
Updated on

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : शेतातून काम संपवून आपल्या आईसोबत शेतरस्त्याने घरी पायी जाणाऱ्या ७ वर्ष वयाच्या मुलावर बिबट्याने अंधाराचा फायदा घेत अचानक हल्ला केला. यामध्ये हा मुलगा जखमी झाल्याची माहिती ओतूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. आईच्या ओरडण्याच्या आवाजाने बिबट्याने धूम ठोकली. ही घटना ओतूर जवळील महाजन पट नामे शिवारात  5 ५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  घडली.

परन रामदास मधे (वय ७, मुळगाव घारगाव, सध्या रा. महाजन पट) असे जखमी मुलाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी वनपाल एम. व्ही. गीते, वनरक्षक खोकले, उदापूरचे वनरक्षक राठोड यांचे समवेत घटनास्थळी धाव घेत भयभीत जखमी मुलाला उपचाराकामी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे दाखल करून पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news