पुणे : शिवगंगा खोऱ्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; आठवडे बाजारात नागरिकांची तारांबळ | पुढारी

पुणे : शिवगंगा खोऱ्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; आठवडे बाजारात नागरिकांची तारांबळ

नसरापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा : हिवाळा ऋतू म्हटलं की गुलाबी थंडीची चादर डोळ्यासमोर समोर येते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे नागरिक आजारी पडत आहे. त्यातच रविवारी शिवगंगा खोऱ्यात अचानक अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे धानपिक, तरकारी पिंकाचे मोठे नुकसान होणार आहे. तर नसरापूर आठवडे बाजारात नागरिकांची तारांबळ उडाली होती.

शिवगंगा खोऱ्यात अनेक ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने सुरुवात केली. साधारण पाऊन तासाने पावसाने विश्रांती घेतली. मात्र जोरदर सऱ्या पडल्याने नसरापूर ( ता. भोर ) येथील आठवडे बाजारात नागरिकांची मोठी तांराबळ उडाली होती. तर अनेक शेतकऱ्यांचे भातपीक कापून झाले आहेत. तर काही कापणी करून ठेवलेले भात पिकाचे भेळा अनेक ठिकाणी भिजले आहेत.

केळवडे, शिवरे, वरवे, साळवडे, कांजळे आदी परिसरात सध्या कांदा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर लागवड सुरु आहे. तर शेतातून कांदा व टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यात अवकाळी पावसामूळे तरकारी पिके व वेलीवरची पिकांची नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाले आहेत.

.हेही वाचा 

परभणी : लव्‍ह जिहाद, धर्मांतरण विरोधात कायद्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा

नागपूर : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचे पोस्टर्स फाडले

‘एम्स’ पाठोपाठ सफदरजंग रुग्णालयालाही हॅकिंगचा फटका

 

Back to top button