पुणे : ‘पीएमआरडीए’च्या प्रकल्पांसाठी केंद्राकडून 105 कोटी मंजूर | पुढारी

पुणे : ‘पीएमआरडीए’च्या प्रकल्पांसाठी केंद्राकडून 105 कोटी मंजूर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) प्रस्तावित आलेल्या म्हाळुंगे-माण नगररचना योजना आणि हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेतील गणेशखिंड रस्त्यावरील आनंदऋषीजी चौकातील (विद्यापीठ चौक) दुमजली उड्डाणपुलासाठी केंद्र शासनाने अनुक्रमे 30 कोटी आणि 75 कोटी, असा एकूण 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
’पीएमआरडीए’कडून म्हाळुंगे-माण नगररचना योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

250 हेक्टरवर ही योजना राबविण्यात येत असून, भूसंपादन केलेल्या एकूण जागेच्या 50 टक्के विकसित जागा जमीनमालकांना मिळणार आहे. परिणामी, सातबारा उतारा संपुष्टात येणार असून, प्रत्येक शेतकर्‍याला मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे. याशिवाय, विकसित 50 टक्के भूखंडावर अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे. शेतीविकास क्षेत्राचे रहिवास क्षेत्रामध्ये रूपांतर होणार आहे. विशेष साहाय्याअंतर्गत निधीचा प्रस्ताव चालू वर्षी मे महिन्यात केंद्राकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार केंद्राकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम केंद्राकडून राज्याकडे वर्ग होणार आहे.

Back to top button