आंबेगावच्या पूर्व भागात बटाटा जोमात | पुढारी

आंबेगावच्या पूर्व भागात बटाटा जोमात

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, लाखणगाव, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, खडकवाडी, वडगावपीर परिसरात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड केली आहे. लागवड केलेला बटाटा आता जोमात आला आहे. यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड केली आहे. सध्या बटाट्याला चांगला बाजारभाव असल्याने शेतकरी समाधानी आहे.
बटाटा लागवड करण्यापासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठे भांडवल शेतात गुंतवावे लागते. त्यामुळे बटाट्याला चांगला बाजार मिळाला तर शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे वाळुंजनगर येथील प्रगतशील शेतकरी बाबाजी वाळुंज यांनी सांगितले.

Back to top button