पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणातील फरारी आरोपीला अटक | पुढारी

पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणातील फरारी आरोपीला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाचा वापर करून अमली पदार्थांची विक्री प्रकरणातील पसार आरोपीला अमली पदार्थ विरोधी पथकाने डेक्कन जिमखाना भागातून अटक केली. स्वप्नील विकास बनसोडे (वय 28, रा. डेक्कन जिमखाना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने समाज माध्यमावरुन अमली पदार्थ विक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता.

यात पोलिसांनी दोन तरुणांना पकडले होते. या प्रकरणात आरोपी बनसोडे पसार झाला होता. बनसोडेला डेक्कन जिमखाना भागातून अटक करण्यात आली. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोज साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.

Back to top button