पुणे: दत्तजयंतिनिमित्त नारायणपूर, गोंदवलेसाठी एसटीच्या ज्यादा गाड्या | पुढारी

पुणे: दत्तजयंतिनिमित्त नारायणपूर, गोंदवलेसाठी एसटीच्या ज्यादा गाड्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एसटीच्या पुणे विभागाकडून दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या सोमवारी (दि.06) आणि मंगळवार (दि.07) रोजी दत्त जयंती सोहळ्या निमित्त नारायणपुर, गोंदावले येथे जाणार्‍या प्रवाशांकरिता उपलब्ध असतील.

या जादा गाडया एसटीच्या पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, बारामती, भोर, शिरुर, नारायणगांव, राजगुरुनगर, तळेगाव, इंदापुर, सासवड दौंड, पिंपरी-चिंचवड बस स्थानकांवरून सोडण्यात येतील. तसेच नारायणपुर येथे जाण्यासाठी हडपसर व कापूरहोळ येथून आवश्यकतेनुसार जादा गाडया सोडण्याचे देखील नियोजन करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

Back to top button