पुणे : चक्क हिरवीकंच पानेही ज्वालाग्रही! | पुढारी

पुणे : चक्क हिरवीकंच पानेही ज्वालाग्रही!

पुणे; पुढारी प्रतिनिधी : पांडवबत्ती या वनस्पतीला गोडेतेल लावल्यावर ती पाने पेट घेतात, याचे प्रात्यक्षिकच सहलीच्या निमित्ताने गेलेल्या विद्यार्थ्यांनी ताम्हिणी घाटात पाहिले अन् विद्यार्थी अवाक झाले. आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी अभ्यास सहली निमित्ताने ताम्हिणी घाटात गेले होते. मुलांना ही पाडंव बत्तीची वनस्पती कोणती आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळे ही वनस्पती प्रा. किशोर सस्ते यांनी प्रत्यक्षात शोधून याची पाने खरोखर पेट घेतात का याची शहानिशा केली. प्रज्वलीत झालेली हिरवीकंच पाने पाहून विद्यार्थी आश्चर्यचकीत झाले.

पांडवांनी लावला शो !
पांडव वनवासात असताना अग्नी प्रज्वलित करण्यासाठी यांच्या पानांचा उपयोग करायचे. दक्षिण भारतात यांचे दिवे मंदिरांमध्ये लावतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये प्रियांगु असे म्हणतात. वनस्पतीचे वानसशात्रीय नाव कैलिकारपा टोमेनटोसा असून ते लॅमिएसी कुळातील आहे. या वनस्पतींच्या पानांवर घनदाट मखमली लव आणि इसेंशीअल, टर्पेन्टाइन ऑईल आहे. या वेळी प्रा. किशोर सस्ते, प्रा. ज्ञानेश्वर थोरे, प्रा. सीमा ढोकणे, प्रा. पल्लवी चंपानेरीया, डॉ. सायमा मीर, प्रियंका शहा, निशी दीक्षित, सचिन गोळसे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

भविष्यात वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जंगलातील जैवविविधतेची आणि पारंपरिक ज्ञानाची महिती देऊन त्या संसाधनांचा पुरेपूर आणि शाश्वत उपयोग समाजासाठी कसा करायचा हे शिकवलं पाहिजे. या वनस्पतीवर भविष्यात संशोधन आवश्यक आहे.

                             – प्रा. किशोर सस्ते, वनस्पती आणि जैवविविधता अभ्यासक

Back to top button