पुणे : ‘त्या’ व्यावसायिकाचे अपहरण प्रेमसंबंधातून; राजस्थान येथून मुख्य सूत्रधाराला अटक | पुढारी

पुणे : ‘त्या’ व्यावसायिकाचे अपहरण प्रेमसंबंधातून; राजस्थान येथून मुख्य सूत्रधाराला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसरमधील व्यावसायिकाचे अपहरण प्रेमसंबंधाच्या कारणातून झाल्याचे समोर आले आहे. खरेदीचा बहाणा करून दुकानात प्रवेश केल्यानंतर, जबरदस्तीने अपहरण करून घेऊन जाऊन वसईच्या जंगलात सोडणार्‍या अपहरणकर्त्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी राजस्थानमधील पाली येथून अटक केली. कैलासराम सोहनलाल जाट (वय 35, रा. पाली, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड, गोविंद (सर्व रा. जालोर, राजस्थान) यांचा शोध सुरू आहे. जाट याला न्यायालयाने पाच डिसेंबरपर्यंंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्यावसायिकाचे मांजरी येथे दुकान आहे. 23 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे जण दुकानात आले. खरेदीचा बहाणा करून त्यांनी मारहाण करीत बोलोरो गाडीतून त्यांना पळवून नेले होते. वाटेत जिवे ठार मारण्याची धमकी देऊन वसई विरार टोलनाक्याजवळील जंगलात पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सोडून ते निघून गेले होते. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर त्यातील एक संशयित राजस्थानातील पाली येथे असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकाने पाली येथे जाऊन कैलासराम जाट याला पकडले. त्यातून अपहरणामागील कारण स्पष्ट झाले.

व्यावसायिकाचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. या तरुणीचे नातेवाईक राजस्थानमध्ये राहतात. त्यांना याची माहिती मिळाली. त्यातून आरोपी केरळ येथून पुण्यात आले. त्यांनी फिर्यादी याचे अपहरण करून पुढे वसईजवळ सोडून दिले व त्यानंतर ते राजस्थानला निघून गेले होते. व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरली होती. पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर होती. याची माहिती बहुदा आरोपींना मिळाली असावी, त्यामुळे त्यांनी व्यावसायिकाला वाटेत सोडून पळ काढला.

नाही तर आरोपी त्याला राजस्थानला घेऊन जाणार होते, असे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने

Back to top button