शिरूरमध्ये महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धेमध्ये 175 मल्ल | पुढारी

शिरूरमध्ये महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धेमध्ये 175 मल्ल

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : केंदूर (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तालुका चाचणी कुस्ती स्पर्धेत विविध वजनी गटातून एकूण 175 मल्ल सहभागी झाले. तब्बल सात तास चाललेल्या स्पर्धेतून एकूण 35 मल्ल जिल्हा चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरल्याचे तालुकाध्यक्ष पैलवान झेंडू पवार, कानिफ गव्हाणे व संतोष साकोरे यांनी सांगितले. खुला वजन गटात अण्णापूर येथील आदित्य पवार (माती विभाग) व श्रेयस होळकर (गादी विभाग) हे दोघे जिल्हास्तरासाठी पात्र ठरले.

केंदूर येथील माजी उपसरपंच पैलवान संतोष साकोरे, भरत साकोरे, भाऊसाहेब थिटे, विलास थिटे व संपूर्ण ग्रामस्थांच्या पुढाकाराने या स्पर्धा झाल्या. जिल्हास्तरासाठी कुमार गटातील पात्र मल्ल, त्यांचा वजनगट व गाव : रुद्र भोकरे (25 किलो, कोरेगाव-भीमा), शंभुराजे ढवळे (25 किलो, वडगाव-रासई), रणवीर गव्हाणे (32किलो, डिंग्रजवाडी), अनुज (35, वडगाव-रासई), प्रणव धुमाळ (38, पिंपळे-खालसा), नितीन कोळपे (42, गुनाट), ओंकार जाधव (45, न्हावरा), प्रशांत रूपनवर (48, गारकोलवाडी), मयूर थोरवे (51, मुखई), अनिल लांबकाने (53, इनामगाव), राज शेलार (60, वडगाव-रासई), साई उमाप (65, जातेगाव बुद्रुक), साई जाधव (71, न्हावरा), ओम साकोरे (80, केंदूर), संस्कार येलभर (92, मोटेवाडी). माती विभागातील मल्ल : गौरव गव्हाणे (57, अण्णापूर), समर्थ पांडे (60, मुखई), प्रतीक शिंदे (65, बाभूळसर खुर्द), आदित्य जाधव (70, न्हावरा), शुभम काळे (75, निमोणे), नीलेश पवार (79, न्हावरा), रविकुमार गव्हाणे (86, कुरुळी), अजित पवार (92,अण्णापूर), ज्ञानेश्वर येलभर (95, मोटेवाडी), आदित्य पवार (86 ते 125 किलो, अण्णापूर).

गादी विभागातील मल्ल : राहुल हरगुडे (57, सणसवाडी), संजय कोळपे (61, गुनाट), सागर कानगुडे (65, आपटी), आबा शेडगे (70, न्हावरा), साई चौघुले (74, निमोणे), आकाश पवार (79, अण्णापूर), उलदीप इंगळे (86, दहीवडी), अमोल धुमाळ (92, धुमाळवाडी), ओंकार येलभर (97, मोटेवाडी) व श्रेयस होळकर (86 ते 125 किलो गट, जातेगाव बुद्रुक)

स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती सुभाष उमाप, शंकर जांभळकर, महाराष्ट्र चँपीयन देवराम दरेकर व माजी सभापती भाऊसाहेब साकोरे यांनी केले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र चँपीयन आबासाहेब काकडे, महाराष्ट्र केसरी विजय गावडे व दिलीप भरणे, जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोंडवे आदींनी मार्गदर्शन केले.

Back to top button