पुणे : आणखी तीन दिवस उकाडा; गुरुवारपासून पुन्हा थंडी | पुढारी

पुणे : आणखी तीन दिवस उकाडा; गुरुवारपासून पुन्हा थंडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यातील किमान तापमानात 5 ते 7 अंशांनी वाढ झाल्यामुळे हिवाळ्यात चक्क उकाडा जाणवत आहे. असे वातावरण तीन दिवस राहील. एक डिसेंबरपासून मात्र पुन्हा थंडी जाणवू लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भातील काही शहरे वगळता राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडीचा कडाका गायब झाला आहे.

हिवाळ्यात उकाडा जाणवत आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे
वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 16 ते 26 अंशांवर गेले आहे.

तीन दिवसांनंतर थंडीत वाढ

राज्यातील सर्वच शहरांच्या किमान तापमानात वाढ झाल्याने 30 नोव्हेंबरपर्यंत थंडी जाणवेल. मात्र, तीन दिवसांनी (1 डिसेंबरपासून) किमान व कमाल, अशा दोन्ही तापमानात घट होऊन थंडीस सुरुवात होईल, असा अंदाज निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button