भाजयुमोतर्फे युवक संघटन करण्यावर भर : शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर | पुढारी

भाजयुमोतर्फे युवक संघटन करण्यावर भर : शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर

भाजयुमोचे शहराध्यक्ष राजेंद्र बापू मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद

भाजयुमोमध्ये काम करताना कशाला प्राधान्य दिले?

मानकर : भाजपकडे तरुणाईला आकर्षित करून त्यांचे मजबूत संघटन बांधण्यावर मी भर दिला. त्यासाठी खासदार गिरीश बापट यांचे मला मोलाचे मार्गदर्शन झाले. भाजप युवक मोर्चा शहराध्यक्षपदी दोन वर्षांपूर्वी माझी नियुक्ती झाली. पुण्यात भाजपाची सत्ता असली तरी त्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. जगभर कोरोनाची साथ पसरली होती. कोरोनाशी सामना करताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही सर्वसामान्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलो. तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांची आम्हाला मोलाची मदत झाली. कोरोनाच्या प्रश्नासाठी विविध आंदोलने केली. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली राजकीय प्रश्नांविषयी आंदोलने सभा मोर्चे आयोजित केले.

युवा वॉरियर्स ही काय संकल्पना आहे?

मानकर : भारत हा 2024 मध्ये जगातील सर्वात तरुण देश असेल हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार मांडला. या तरुणाईला दिशा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युवा वॉरियर ही संकल्पना आणली. महाविद्यालयीन युवक म्हणजे 18 ते 25 वयोगटातील तरुण-तरुणींना भाजपबरोबर जोडण्यासाठी त्यांना युवा वॉरियर करण्याचे ठरले. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्यातील तसेच पुण्यातील हजारो युवक युवतींशी संपर्क साधला.

तुमच्या कारकिर्दीत झालेला संस्मरणीय कार्यक्रम कोणता ?

मानकर: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ संघ स्वयंसेवक यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचा कृतज्ञता सत्कार केला.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांचा महाराष्ट्रातील दौरा महत्त्वपूर्ण ठरला. पुण्यात त्यांचे विविध कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांशी त्यांनी केलेला संवाद खूपच गाजला. त्यांच्या रॅलीलाही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निवडणुकांची तयारी कशी करत आहात?

मानकर: पक्षाचा तरुण कार्यकर्त्यांना प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्त करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. खासदार, आमदार भाजपचे शहराध्यक्ष भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली. सहा महिने आम्ही या योजनेवर काम करीत आहोत घरोघरी भेटी देत मतदारांशी संपर्क साधताना युवा कार्यकर्ते त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देतील. या प्रचाराच्या माध्यमातून हे कार्यकर्ते पक्षाला विजयापर्यंत घेऊन जाते.

24 X 7 कार्यालय यामागची तुमची भूमिका काय आहे ?

मानकर: सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी मी गेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी 2016 मध्ये सदाशिव पेठ चोवीस बाय 7  कार्यालय सुरू केले. दररोज 24 तास सुरू असलेले हे पुण्यातील पहिलेच कार्यालय ठरले. मी या भागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही कार्यकर्ते 24 तास उपलब्ध आहोत. नागरिक त्यांच्या किरकोळ समस्या ही आमच्याकडे घेऊन येतात. त्यांची आम्ही असंख्य कामे केली. त्यांच्या समस्या सोडविल्या अनेक उपक्रम राबविले जनसंपर्क वाढला.

निवडणुकीत तरुणांना उमेदवारी देण्याची मागणी

भाजप पुण्यात किती जागा मागणार

 मानकर : भाजपने सध्या देशातील विविध निवडणुकांमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी देण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसून येते. पुण्यातही आम्ही भाजपच्या कार्यक्रम करतात जास्तीत जास्त संधी देण्याची मागणी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्याकडे करणार आहोत. महापालिकेत भाजपचे तरुण नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आल्यास पक्षाचे आगामी नेतृत्व तयार होण्याची प्रक्रिया सुरू राहील. तरुण कार्यकर्ते यांना किती जागा द्यावयाच्या ते पक्षश्रेष्ठी ठरवतील.

कोरोना काळातील कामे

रेमेडी शिबिर मिळण्यासाठी आंदोलन
333 धान्य किटचे वाटप
सणस मैदानातील पारंपारिक सेंटरमध्ये जेवण पुरवणे
विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी आंदोलन
गरोदर महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका

अन्य महत्त्वपूर्ण कामे
मध्यवस्तीतील नागरिकांसाठी वैद्यकीय हेल्पलाइन
मोफत रुग्णवाहिका
सेवा कार्य करून वाढदिवस साजरा
प्लंबर ,सुतार, बिगारी अशी विविध कामे करणारे लोक अत्यल्प मोबदल्यात पुरवले
स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय

Back to top button