पुणे: वक्फ बोर्डाच्या उद्देशालाचा दिली जातेय बगल: के. रहमान खान | पुढारी

पुणे: वक्फ बोर्डाच्या उद्देशालाचा दिली जातेय बगल: के. रहमान खान

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्य वक्फ बोर्डांची कामगिरी निराशाजनक असून, हे मुस्लिम समाजासाठी चिंतेचे कारण बनली आहे. ज्या उद्देशासाठी बोर्डाची स्थापन करण्यात आली. त्या उद्देशालाच बगल दिली जात आहे, अशी खंत माजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री के. रहमान खान यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली. वक्फ बोर्डाच्या मालमत्तांच्या वापराविषयी आयोजित राष्ट्रीय परिषदेत के. रहमान खान बोलत होते. या परिषदेला देशभरातून तज्ज्ञ व्यक्ती सहभागी झाले आहेत.

वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून, हे अतिक्रमण काढण्याचे अधिकारी बोर्डाला आहेत. परंतु, वक्फ बोर्ड आपल्या अधिकाराचा वापरत करत नाही. दुसरीकडे मुतवल्लींसह (काळजी घेणारे) मंडळाचे सदस्य आपापसातील भांडणात वेळ घालवत आहेत. परिमाणी ज्यामुळे मंडळाच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून, मंडळाचे कामकाज कमकुवत झाले आहे, असे खान म्हणाले.

महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन अँड टास्क फोर्सचे (एमडब्ल्यूएलपीटी) सल्लागार यांनी वक्फ प्रकरणांमध्ये मुस्लिम समाजाच्या अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. समाजाच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठे, महाविद्यालये, रुग्णालये, शाळा, कौशल्य विकास केंद्रे, दवाखाने यांच्या विकासाला  चालना देण्याची गरज आहे, असे मत आयकर विभागाचे माजी मुख्य आयुक्त अकरमुल जब्बार खान यांनी व्यक्त केले.

Back to top button