पिंपरी : थकबाकीदारांच्या सदनिका पालिकेकडून सील | पुढारी

पिंपरी : थकबाकीदारांच्या सदनिका पालिकेकडून सील

पिंपरी : थकबाकी असलेल्या मिळकतधारकांचा तब्बल 50 सदनिका महापालिकेच्या करसंकलन विभागाने सील केल्या आहेत. त्यांच्याकडे 55 लाखांची थकबाकी आहे. ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. शहरात 5 लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत 2 लाख 87 हजार 446 मिळकतधारकांनी 466 कोटींचा भरणा केला आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 मिळकती, 50 हजारांपुढे थकबाकी असणार्‍या 26 हजार 760 मिळकती आणि एकदाही कर न भरलेल्या 3 हजार 850 अशा एकूण 31 हजार 971 मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

तसेच, 3 लाख निवासी मिळकतधारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे करसंकलन विभागाने थकबाकीदारांच्या मिळकत जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ूये पिंपरी, रावेतम, वाकड, पुनावळे, पिंपळे-सौदागर, चिंचवड, तळवडे इत्यादी ठिकाणच्ूया 50 बंद सदनिकांना बुधवारी (दि.24) सील लावण्यात आले. आतापर्यंत 300 निवासी व बिगरनिवासी मिळकती जप्त केल्या आहेत.

Back to top button