शिक्रापूर : सरपंचांवर हल्ला करणार्‍यांना अटक करा | पुढारी

शिक्रापूर : सरपंचांवर हल्ला करणार्‍यांना अटक करा

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सरपंच रमेश गडदे यांच्यावर चार दिवसांपूर्वी गावातील काही युवकांनी हल्ला करत मारहाण केली होती. त्यामुळे आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांनी गुरुवारी (दि. 24) निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी हल्ला करणार्‍यांना अटक करून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देण्यात आले. सरपंच रमेश बबन गडदे यांच्यावर 19 नोव्हेंबर रोजी गावातील काही युवकांनी हल्ला करत मारहाण केली होती.

याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, तर चौघे फरारी झाले आहेत. या निषेध सभेला सरपंच रमेश गडदे, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे, मोहिनी युवराज मांढरे, शालन राऊत, उषा राऊत, मंगल सासवडे, माजी उपसरपंच दत्ता गिलबिले, नवनाथ सासवडे, सागर सायकर, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष गोरक्ष सासवडे आदी व ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना यापूर्वी सत्तर वर्षात सरपंचांवर हल्ला होण्याची घटना यापूर्वी कधीच घडलेली नाही. सरपंच हे गावाला अडचणीतून बाहेत काढण्याचे काम करत असतात. परंतु सरपंच यांना अडचण आल्यास गावाने त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. सरपंच कोणत्या गटाचा आहे हे महत्त्वाचे नसून सरपंच गावचा आहे याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे, असे रामभाऊ सासवडे यांनी सांगितले. यावेळी अनेक वक्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

Back to top button