कात्रज-कोंढवा रोड भागात पेट्रोल चोरांचा सुळसुळाट | पुढारी

कात्रज-कोंढवा रोड भागात पेट्रोल चोरांचा सुळसुळाट

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रोडवरील सोसायटीच्या पार्किंगमधील गाड्यांमधून पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीतून पेट्रोल चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पेट्रोलच्या किमतीत वाढ होत असल्याने चोरटे आता पेट्रोल चोरी करण्याकडे वळलेले आहेत. कात्रज -कोंढवा रोडवरील एका सोसायटीमधील पार्किंगमध्ये उभ्या असणार्‍या दुचाकीतून चोरट्यांनी पेट्रोल चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

कात्रज कोंढवा रोडवरील शिवशंभोनगर येथील यशवंत विहार सोसायटीमधून बुधवारी (दि. 23 ) चोरट्यांनी पहाटेच्या वेळेस एका दुचाकीतून पेट्रोल चोरी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. जवळपास सहा मोटारसायकलमधून पेट्रोल चोरी झाल्याचे नागरिक सांगत आहेत. सोसायटीचे खजिनदार संजय भोंडवे म्हणाले की, पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी सहा मोटारसायकलमधून पेट्रोल चोरी केले आहे. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात येणार आहेे.

पेट्रोल चोरीसंदर्भात आमच्याकडे काही तक्रारी नाहीत. याबाबत तक्रार आल्यास तपास करून कारवाई केली जाईल.
                                                                               -श्रीहरी बहिरट,

Back to top button