भिगवण : चोरीप्रकरणी सराइतासह दोघे अल्पवयीन ताब्यात | पुढारी

भिगवण : चोरीप्रकरणी सराइतासह दोघे अल्पवयीन ताब्यात

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश वाढल्याचे दिसून येऊ लागले आहे. भिगवण पोलिसांनी गंभीर स्वरूपांचा तपास करताना एक सराईत गुन्हेगार व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चक्क 18 मोबाईल व तीन मोटारसायकली, असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कृष्णा शिवाजी कांबळे (रा. खानवटे, ता. दौंड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, करमाळा तालुक्यातील शेलगाव येथील 13 वर्षीय एक व इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलांना याप्रकरणी ताब्यात घेऊन त्यांना बालसुधार न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दि. 12 आणि 13 नोव्हेंबर यादरम्यान डाळज नंबर 2 येथून ऊसतोड मजुरांनी कोपी बाहेर चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरीला गेले होते. यावरून प्रमोद पानसरे यांनी फिर्याद दिली होती.  दि. 30 ऑक्टोबर रोजी भिगवण येथून
वर्दळीच्या ठिकाणाहून एक दुचाकी चोरीला गेली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथक नेमण्यात आले होते. गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता वरील तिघांना संशयावरून ताब्यात घेत चौकशी करताच त्यांनी चोरीची कबुली दिली. ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम तसेच विजय लोडी, सचिन पवार, महेश उगले, सलमान खान, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार, रणजित मुळीक यांच्या पथकाने चोरीचा छडा लावला आहे.

Back to top button