पुण्यातील ४८ वाहनांना धडक देणाऱ्या चालकाला अटक | पुढारी

पुण्यातील ४८ वाहनांना धडक देणाऱ्या चालकाला अटक

पुणे : नवले पूल येथे अपघातात फरार झालेल्या चालकाला सिंहगड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मनिराम यादव असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव असून त्याला चाकण येथील नानेकरवाडी येथून ताब्यात घेतले आहे.

रविवारी या चालकाने गाडी उतारावर नुट्रल ठेवून चालवली असताना त्याला गाडीचे ब्रेक लागला नाही. त्यामुळे त्याने जवळपास ४८ वाहनांना धडक दिली होती. यात सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. या ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे

Back to top button