कोरोनाचे दिवसभरात 12 बाधित रुग्ण | पुढारी

कोरोनाचे दिवसभरात 12 बाधित रुग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात कोरोनाचे शुक्रवारी (दि. 18) दिवसभरात 12 बाधित रुग्ण आढळले. तर, 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात शहरातील 430 संशयित रुग्णांवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 3 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 91 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 72 हजार 592 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 68 हजार 599 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 630 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button