सासवड : बोगस एजंटकडून शेतकर्‍याची 2 लाख 40 हजारांची फसवणूक | पुढारी

सासवड : बोगस एजंटकडून शेतकर्‍याची 2 लाख 40 हजारांची फसवणूक

सासवड; पुढारी वृत्तसेवा : समाजकल्याण विभागामध्ये ट्रॅक्टर मंजूर झाला नसताना मंजूर झाला आहे, तुम्हाला देतो, असे सांगून कोडीत येथील शेतकर्‍याकडून 2 लाख 40 हजार रुपये घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विजय नारायण ओव्हाळ (रा. रावडी, ता. भोर), नीलेश अशोक साळुंके (रा. रायरी, ता. भोर) आणि अमित शिवाजी कांबळे (रा. वडतुंबी, ता. भोर) यांच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती वामन जरांडे (रा. कोडीत बुद्रुक, ता. पुरंदर) हे पुरंदर तहसील कार्यालयात काही कामानिमित्त आले होते. तेथे त्यांचे मित्र विनायक काशिनाथ गायकवाड (रा. बोपगाव) हे भेटले. त्यांच्याबरोबर विजय ओव्हाळ व समाजकल्याण विभागाचे आयकार्ड गळ्यात घातलेले थोरात नावाची व्यक्ती होती. ते म्हणाले, समाजकल्याण विभागामार्फत दादासाहेब गायकवाड सबलीकरण कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत 25 टक्के रक्कम भरून कुबोटो कंपनीचा ट्रॅक्टर (27 एच.पी.) विजय ओव्हाळ यांचा भाऊ नितीन ओव्हाळ व नीलेश साळुंके यांना मंजूर झाला आहे.

तसेच ट्रॅक्टर घेण्यासाठी मूळ किमतीच्या 25 टक्के रक्कम 1 लाख 55 हजार रुपये व इतर खर्चासाठी 85 हजार रुपये भरायचे आहेत. परंतु त्यांची पैशांची जुळवाजुळव होत नाही, तुम्हाला घ्यायचा असेल तर पाहा, तुम्हाला ट्रॅक्टर मिळवून देतो असे सांगण्यात आहे. नीलेश साळुंके हे रायरी गावचे पोलिस पाटील असल्याने याबाबत शंका न आल्याने मारुती जरांडे यांनी विजय ओव्हाळ, नितीन ओव्हाळ, थोरात व नीलेश साळुंके यांना 2 लाख 40 हजार रुपयांचे दोन धनादेश दिले. मात्र यामध्ये समाजकल्याण विभागात चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. समाजकल्याण विभागाचे अधिकारी असल्याचे भासवणारे थोरात यांचे खरे नाव अमित शिवाजी कांबळे (रा. वडतुंबी, ता. भोर) असे आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करीत

Back to top button