कोंढव्यात पित्याचा पोटच्या मुलीवर सहा वर्षाची असल्यापासून अत्याचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोंढव्यात तेरा वर्षाच्या मुलीवर ती सहा वर्षाची असल्यापासून नराधम पिता अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पित्याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत 13 वर्षीय पिडीत मुलीच्या वतीने तिच्या शाळेच्या शिक्षीकेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या शाळेच्या शिक्षकेला सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.

याप्रकरणी धक्कादायक एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर संबंधीत शिक्षीकेने एका समुपदेशकामार्फत माहिती घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.

नराधम पिता मुलगी सहा वर्षाची असल्यापासून तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समजले. दाखल गुन्ह्यातील फिर्यादीनंतर पित्याला अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.

हडपसर येथे नऊ वर्षाच्या मुलीवर तर आठवडाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर तेरा जणांनी सामुहिक बलात्कार केल्याचा तर त्यानंतर सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आता हा प्रकार उघडकीस आला आहे.

Back to top button