पुणे : भूजल विभागासाठी भरती प्रक्रिया राबविणार : गुलाबराव पाटील यांची घोषणा | पुढारी

पुणे : भूजल विभागासाठी भरती प्रक्रिया राबविणार : गुलाबराव पाटील यांची घोषणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या जलजीवन मिशनच्या कामात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची (जीएसडीए) महत्त्वाची भूमिका आहे. त्यासाठी पाण्याची शुद्धता तपासणार्‍या 178 प्रयोगशाळांचे राज्यातील सर्वांत मोठे जाळे तयार करणारा हा विभाग आहे. या विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न आहे,’ असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ‘यशदा’ येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमासाठी ध्वनिचित्रफीत संदेशाच्या माध्यमातून संवाद साधताना पाटील बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम, साखर आयुक्त शेखर गायकवाड, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, मयशदाफचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, युनिसेफचे वॉश स्पेशालिस्ट युसूफ कबीर उपस्थित होते.

Back to top button