पुणेकरांना हॉर्टिकल्चर प्रदर्शन पाहण्याची पर्वणी | पुढारी

पुणेकरांना हॉर्टिकल्चर प्रदर्शन पाहण्याची पर्वणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘हॉर्टी प्रो-इंडिया’तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉर्टिकल्चर आणि रोपवाटिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, रविवार दि. 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय हॉर्टिकल्चर आयुक्त प्रभात कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बापू घडामोडे, महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास जोगदंड, वसू इव्हेंटचे विजय रासने, वसंतराव रासने, संतोष झाबरे, शरद भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले होते. या वेळी हॉर्टिकल्चरतज्ज्ञांनी शेतकरी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. प्रभात कुमार म्हणाले की, हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत.

या योजनांचा लाभ तरुणांनी घ्यावा. केंद्र सरकारने हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये अधिकाधिक तरुणांनी व्यवसाय आणि रोजगारनिर्मिती करावी. यासाठी अनेक योजना निर्माण केलेल्या आहेत. या योजनांची माहिती घेऊन तरुणांनी या क्षेत्रामध्ये व्यवसायनिर्मिती आणि त्यातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिकांत धुमाळ यांनी केले.

Back to top button