ससून हॉस्पिटल : नर्सच्या वेशभूषेतील महिलेनं ३ महिन्यांच्या मुलीला पळवलं! - पुढारी

ससून हॉस्पिटल : नर्सच्या वेशभूषेतील महिलेनं ३ महिन्यांच्या मुलीला पळवलं!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 3 महिन्यांच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेनं वॉर्डातून पळवून नेलं आहे.

22 वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्यांची मुलगी अनेक दिवसांपासून ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती.

याप्रकरणी खराडी परिसरातील एका संशयित महिलेला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

नर्सच्या वेशभूषेत आलेल्या सव्वीस वर्षे महिला आणि तिचा पती या दोघा संशयितांनी तीन महिन्यांच्या मुलीला पळविल्याने खळबळ उडाली आहे. संशयित पती- पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्यांचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवल्याने ससून हॉस्पिटलमधील सुरक्षा यंत्रणेवर सवाल निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तपास करून संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : SATERI MANDIR | कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदिर | Sateri Hill Station

Back to top button