पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात बुधवारी (दि. 25) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 3 हजार 500 रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांनी दिली. सासवड येथील उपबाजारात सोनोरी, दिवे, गराडेसह संपूर्ण पुरंदर, दौंड, बारामती अशा विविध भागांतून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आदी धान्य विक्रीसाठी येते.
बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल 3 हजार 500 रुपये, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान 2 हजार 400 हजार रुपये, तर सरासरी 2 हजार 950 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.
या वेळी सभापती शरद जगताप, उपसभापती महादेव टिळेकर, संचालक देविदास कामथे, सचिव मिलिंद जगताप, लिपिक विकास कांबळे, आर. के. ट्रेडर्सचे रूपचंद कांडगे, शेतकरी दशरथ खेसे, अंकुश थोरात, दीपक मोकाशी, लालासाहेब जगताप, सागर भगत आदी उपस्थित होते.
पीक किमान कमाल सरासरी
ज्वारी 2400 3500 2950
बाजरी 2000 2800 2500
गहू 2500 3300 2900
तांदूळ 4500 5500 5000
हरभरा 7000 8000 7500