पुणे : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कॉलेजमध्ये तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न | पुढारी

पुणे : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कॉलेजमध्ये तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेज मधील फार्मसीच्या विभागातील लेडीज हॉस्टेलमध्ये मुलींच्या टॉयलेट मध्ये घुसून एका कॉलेज तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी एका अज्ञात वर गुन्हा दाखल करण्यात आला असून वानवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सावंत यांच्या पुण्यातील हांडेवाडी रोडवर असलेल्या फार्मसी कॉलेजमधील गर्ल टॉयलेट मध्ये एका अनोळखी व्यक्तीने घुसून युवतीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न बुधवारी सकाळी 11 वाजता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता उपायुक्त नम्रता पाटील, वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी घटनास्थळी भेट दिली.

Back to top button